प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपर्यंत कोरोनाने 17 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळीची संख्या 563 झाली आहे. सायंकाळपर्यंत कोरोना चे 594 नवे रुग्ण दिसून आले. तसेच 781 जणांना घरी जाऊ दिले. त्यामुळे कोरोना मुक्ताची संख्या दहा हजार 847 झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 19 हजार 81 झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी गेल्या चोवीस तासात कोरोनाने भुदरगड तालुक्यातील बेल्हे येथील 65 वर्षीय महिला, रंकाळा येथील 67 वर्षीय महिला, कागल तालुक्यातील बाचणी येथील 39 वर्षीय पुरुष, शहरातील शनिवार पेठेतील 57 वर्षीय पुरुष, उत्तरेश्वर पेठेतील 59 वर्षे पुरुष यांचा सीपीआरमध्ये तर इचलकंरजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजीतील शांतीनगर येथील 56 वर्षीय पुरुष, हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील 65 वर्षीय पुरुष आणि 71 वर्षे पुरुष यांचा मृत्यू झाला. कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात करवीर तालुक्यातील गिरगाव येथील साठ वर्षे पुरुष गडहिंग्रज येथील उपजिल्हा रुग्णालयात चंदगड तालुक्यातील नित्तूर येथील 75 वर्षीय वृद्ध, रत्नागिरी जिह्यातील खेड् येथील 68 वर्षे पुरुष त्याचा मृत्यू झाला. शहरातील महाराणा प्रताप चौकातील हॉस्पिटलमध्ये सुर्वे नगर येथील 55 वर्षे पुरुष, शास्त्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये मिरजेतील 78 वर्षीय वृद्ध करवीर तालुक्यातील आरे येथील 88 वर्षे वृद्ध, कर्नाटकातील बागलकोट येथील 82 वर्षीय वृद्ध तसेच कोल्हापुरातील गंजीमाळ येथील 25 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
चोवीस तासातील सतरा मृत्यूमुळे कोरोना बळींची संख्या 563 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ग्रामीण भागात 203 नगरपालिका क्षेत्रात 190 कोल्हापूर शहरात 149 आणि अन्य 22 जणांचा कोरोना मृत्यूत समावेश आहे. 24 तासात सापडलेल्या रुग्णात आजरा 8 भुदरगड 19, चंदगड दोन, हातकणंगले 47, कागल तेरा करवीर 94, पन्हाळा बत्तीस, राधानगरी 19, शाहुवाडी 2, शिरोळ 41 नगरपालिका क्षेत्र 162, कोल्हापूर शहरात 263 आणि अन्य तेरा अशा 592 जणांचा समावेश आहे. आजपर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 19 हजारांवर गेली आहे 19 हजार 81 आहे. दिवसभरात 781 कोरोना मुक्त झाल्याने आजपर्यंतची कोरूना मुक्ताची संख्या दहा हजार 847 झाली आहे. सद्यस्थितीत जिह्यात सात हजार 671 जण उपचार घेत आहेत, गेल्या चोवीस तासात आलेल्या कोरोना रिपोर्ट मध्ये सिबी नेटचे 1,401 रिपोर्ट आहेत. यामध्ये एक हजार 93 निगेटिव. आहेत 557 रिपोर्ट आले आहेत यामध्ये 378 निगेटिव्ह आणि 179 पॉझिटिव्ह आहेत.









