प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात बुधवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 14 जणांचा मृत्य़ू झाला. दिवसभरात 447 नवे रूग्ण आढळले तर 2 हजार 361 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 7 हजार 834 झाली आहे. नव्या रूग्णांसह कोरोना मृत्यू आणि सक्रीय रूग्णांत घट झाली आहे. टेस्टही घटल्या आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 8 हजारांच्या खाली आली आहे.
जिल्हय़ात बुधवारी कोरोनाने 14 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 381 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 911, नगरपालिका क्षेत्रात 753, शहरात 1 हजार 147 तर अन्य 570 आहेत. दिवसभरात 2 हजार 361 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 81 हजार 531 झाली आहे. गेल्या 24 तासांत 447 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 12, भुदरगड 6, चंदगड 11, गडहिंग्लज 11, गगनबावडा 0 हातकणंगले 40, कागल 15, करवीर 91, पन्हाळा 17, राधानगरी 10, शाहूवाडी 3, शिरोळ 31, नगरपालिका क्षेत्रात 41, कोल्हापुरात 156 तर अन्य 9 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 94 हजार 746 झाली आहे.
परजिल्हय़ातील तिघांचा तर कोल्हापुरातील एकाचा मृत्य़ू
परजिल्हय़ातील सांगलीतील एकाचा तर बेळगावमधील दोघांचा मृत्यू झाला. शहरात 156 नवे रूग्ण दिसून आले. कोरोनाने यादवनगर येथील एकाचा मृत्यू झाला आहे.
Previous Articleकेळवलीत ‘तळीये’ सारखी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
Next Article बॅडमिंटनचे गॉड फादर!









