कोल्हापूरचा मृत्यू दर देशात उच्चांकी, मृत्यूदर कमी करण्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय, पालकमंत्र्यांसमवेत चर्चेनंतर निर्णय, दुध, औषध वगळता सर्वच बंद राहणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना संसर्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. हे प्रमाण देशात उच्चांकी आहे. ते कमी करण्यासाठी जिल्ह्यात 10 ते 14 दिवसांच्या कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. पालकमंत्री सतेज पाटील आल्यानंतर दोन दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या लॉकडाऊनमध्ये दुध आणि औषधसेवा वगळता सर्वच बंद राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोनास्थितीच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.









