प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 46 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील 42 आहेत. गेल्या 24 तासांत 1 हजार 774 नवे रूग्ण आढळले. कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांत वाढ झाली आहे. पण सक्रीय रूग्णसंख्येत घट झाली आहे. सध्या सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 528 आहे. दिवसभरात 1 हजार 463 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी शहरासह करवीर, हातकणंगलेत 200 हून अधिक तर पन्हाळा, शिरोळ तालुका, इचलकरंजी नगरपालिका क्षेत्र व अन्य जिल्ह्यातील शंभरांवर नवे रूग्ण दिसून आले आहेत.
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 46 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये परजिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 350 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 1 हजार 699, नगरपालिका क्षेत्रात 551, शहरात 688 तर अन्य 412 आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 528 आहे. दिवसभरात 1 हजार 463 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 81 हजार 73 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनील माळी यांनी दिले.
शहरात 340 तर परजिल्ह्यातील 160 नवे रूग्ण
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 774 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 9, भुदरगड 79, चंदगड 50, गडहिंग्लज 36, गगनबावडा 3, हातकणंगले 219, कागल 49, करवीर 253, पन्हाळा 127, राधानगरी 23, शाहूवाडी 12, शिरोळ 127, नगरपालिका क्षेत्रात 287 कोल्हापुरात 340 तर अन्य 160 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 97 हजार 951 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 2 हजार 882 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 461 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 3 हजार 110 अहवाल आले. त्यातील 2 हजार 471 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 3 हजार 524 रिपोर्ट आले. त्यातील 2 हजार 694 निगेटिव्ह आहेत. टेस्ट वाढल्याने रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांत परजिल्ह्यांतील चौघे आहेत. यामध्ये चिकोडी बेळगाव 55 वर्षीय महिला, चुनाभट्टी मुंबई 73 वर्षीय पुरूष, कणकवली 32 वर्षीय पुरूष आणि हालमट्टी चिकोडी येथील 68 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. कोरोना मृतांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी, ममदापूर, पुलाची शिरोली, गडहिंग्लज, कासार्डे वारूळ, फुलेवाडी, टेंबलाईवाडी, शाहूपुरी, मडिलगे गारगोटी, इचलकरंजीतील जवाहरनगर, शहापूर, जवाहरनगर, विक्रमनगर, गणेशनगर, यशवंत कॉलनी, पोवार मळा, आंबेडकर नगर, खोतवाडी, कबनूर, रांगोळी, कबनूर, इचलकरंजी, शेंद्री, लाकूडवाडी, मुगळी, कागल, तडशिहाळ, तुडये, इचलकरंजी, शिवाजी पेठ, नाधवडे, वडणगे, मोरेवाडी, उचगाव, वरणगे पाडळी, निलजी, रंकाळा, भाचरेवाडी, हुपरी, शिवाजी पार्क, फुलेवाडी, इचलकरंजी, उत्साळी चंदगड येथील व्यक्तींचा समावेश आहे.









