24 तासांत 21 जण कोरोनामुक्त, पॉझिटिव्ह रूग्ण 9 , कोरोनामुक्त 21, कोरोना मृत्यू 1
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने आजरा तालुक्यातील मडिलगे येथील 70 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 717 झाली आहे. गेल्या 24 तासांत 9 नवे रूग्ण दिसून आले. तसेच 21 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 240 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात आजपर्यत केरोनाने 1,717 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 846, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 369 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. सध्या 65 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 240 जणांची तपासणी केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून रविवारी 957 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 934 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 41 रिपोर्ट आले. त्यापैकी 37 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 64 रिपोर्ट आले, त्यापैकी 63 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 3, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 5 व अन्य 0 असे 9 रूग्ण आहेत. दिवसभरात 21 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 67 झाले. नव्या 9 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 849 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 849
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 067
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 65
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1717
गेल्या 24 तासांत 240 संशयितांची तपासणी