प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील 65 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. जिल्ह्यात अन्यत्र कोठेही कोरोना बळीची नोंद झालेली नाही. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 68 नवे रूग्ण दिसून आले तर 34 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 45 हजार 287 झाली आहे. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 47 हजार 961 झाली आहे. सध्या 1 हजार 37 रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 372 संशयितांची तपासणी केली. त्यापैकी 164 जणांची ऍटीजेन टेस्ट केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. अनील गवळी यांनी दिली.
जिल्ह्यात बुधवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 372 जणांची तपासणी झाली. सध्या 1 हजार 37 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून 569 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 520 निगेटिव्ह तर 45 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 164 रिपोर्ट आले. जिल्ह्यात कोरोनाने हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील 65 वर्षीय पुरूषाचा आयजीएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या 1 हजार 637 झाली आहे. कोरोनाने ग्रामीण भागात 802, नगरपालिका क्षेत्रात 338 महापालिका क्षेत्रात 359 तर अन्य 138 जणांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासांत 34 जण कोरोनामुक्त झाले.
कोरोनामुक्तांची संख्या 45 हजार 287 झाली आहे. आजरा 2, भुदरगड 3, चंदगड 5, गडहिंग्लज 5, गगनबावडा 0, हातकणंगले 6, कागल 5, करवीर 6, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 3, शिरोळ 6, नगरपालिका क्षेत्रात 6, कोल्हापूर शहर 16 आणि अन्य 4 असे 68 रूग्ण असल्याची माहिती डॉ. अनील माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 68,
कोरोनामुक्त 34, कोरोना मृत्यू 1
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण : 47 हजार 961
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण : 45 हजार 287
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण : 1 हजार 37
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी : 1 हजार 637