ऑनलाईन टीम / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीसाठी गेले महिनाभर सूरु असणारे आरोप – प्रत्यारोप आज झालेल्या मतदान प्रक्रिया पार पडल्याने थांबले. आज दिवसभरात जिल्हा बँकेसाठी चुरशीने मतदान झाले. जवळपास सायंकाळी पाच वाजे पर्यंत 99 टक्के मतदान झाले असून 7651 पैकी 7498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर सर्वाधिक मतदान 99.67 टक्के विकास सेवा संस्था गटातून झाले आहे. दरम्यान या निवडणूकीची मतमोजणी शुक्रवार दि. 7 जानेवारी रोजी कोल्हापूर शहरातील रमणमळा परिसरातील शासकिय सभागृहात पार पडणार आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे.
राज्याच्या महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्र असणारे नेते मंडळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीसाठी वेगवेगळ्या आघाड्यांद्वारे लढले आहेत. या निवडणूकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप एकत्र राहीले असून शिवसेनेसह मित्र पक्ष यांनी सवता सुबा मांडला आहे. त्यामूळे या निवडणूकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीले आहे.
कोणत्या गटातून किती टक्के मतदान
विकास सेवा गटातून सर्वाधिक ९९.६७ टक्के मतदान झाले आहे.
प्रक्रिया संस्था गटातून ९९.५५ टक्के मतदान झाले आहे.
पतसंस्था गटातून ९८.८५ टक्के मतदान झाले
इतर गटातून ९७.०५ टक्के मतदान पूर्ण