वार्ताहर / कोवाड
कोवाड ता. चंदगड परीसरात गेले दोन दिवस धुवाधार पाऊस सुरूच असल्याने येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंदाऱ्यालापूर आला आहे. रविवार दि.16 रोजी सकाळ पासूनच पूराचे पाणी बाझार पेठेत शिरत असल्याने व्यापारी वर्ग पुन्हा एकदा धास्तावला आहे. आठ दहा दिवसांपुर्वीच नदीला पूर आला होता. म्हणून बाझार पेठेतील व्यापारी बंधूंनी दुकानातील साहित्य काढले होते. पाच दिवसाच्या मुक्कामाने पूर ओसरल्यानंतर पुन्हा दुकाने धूवून स्वच्छ करून मोठया कष्टाने साहित्य लावले होते.
गणेशोत्सवाच्या तोंडावर व्यापार वाढेल या उद्देशाने दुकानांतून माल मोठया प्रमाणात भरून दुकाने सज्ज झाली होती. मात्र पुन्हा पुराने डोकंवर काढल्याने लावलेले साहित्य काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. गत सालचा नुकसानग्रस्त महापूर , मार्च पासून कोरोनामूळे बाजारपेठ बंद चालूचा खेळ आणी पुन्हा दोन वेळा पूर यामूळे कोवाड बाझारपेठेतील व्यापारी बंधू मोठया आर्थीक अडचणीत सापडले आहेत. तर मागच्या पूरात आणी वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झालेली ऊस पिके बांधण्या आदीच शिवारे पुन्हा पाण्याने तुडूंब झाल्याने शेतकरी वर्ग ही हवालदिल झाला आहे.
Previous Articleसांगली : बोरगाव – रेठरे हरणाक्ष बंधारा पाण्याखाली
Next Article अमेरिकेत कोरोनाबाधितांनी गाठला 55 लाखाचा टप्पा









