24 तासांत 633 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात रविवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 31 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 60 झाली आहे. सायंकाळपर्यत 740 रूग्ण नवे रूग्ण दिसून आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 34 हजार 630 झाली आहे. 633 रूग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 22 हजार 744 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
जिल्हय़ात रविवारी सीपीआरसह अन्य केअर सेंटरमध्ये 1 हजार 289 जणांची तपासणी केली. त्यातील 1 हजार 371 जणांचे स्वॅब घेतले, 526 जणांची अँटीजेन टेस्ट केली. सध्या 10 हजार 827 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत शेंडा पार्क येथील लॅबमधून 2 हजार 207 रिपोर्ट आले. त्यापैकी 1 हजार 826 निगेटिव्ह तर 325 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 526 रिपोर्ट आले. त्यापैकी 415 निगेटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हय़ात रविवारी कोरोनाने 31 जणांचा मृत्य़ू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये सातवे पन्हाळा येथील 75 वर्षीय पुरूष, चिखली करवीर येथील 85 वर्षीय पुरूष, नवीन वाशी नाका येथील 75 वर्षीय पुरूष, रूईकर कॉलनी येथील 35 वर्षीय पुरूष, चंदगड तालुक्यातील बालिगले येथील 64 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजी येथील काडापुरे मळा येथील 58 वर्षीय पुरूष, इस्लामपूर वाळवा येथील 65 वर्षीय पुरूष, खोतवाडी हातकणंगले येथील 46 वर्षीय पुरूष, शिरदवाड शिरोळ येथील 70 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
शहर, जिल्हय़ातील केअर सेंटर, खासगी हॉस्पिटल्समध्ये पाचगाव करवीर येथील 65 वर्षीय पुरूष, साळगाव आजरा येथील 72 वर्षीय पुरूष, वाटंगी आजरा येथील 74 वर्षीय पुरूष, कोतोली पन्हाळा येथील 60 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, तिळवणी हातकणंगले येथील 70 वर्षीय पुरूष, शित्तुर तर्फ वारूण शाहूवाडी येथील 68 वर्षीय पुरूष, तवंदी, निपाणी येथील 82 वर्षैय पुरूष, कुडाळ सिंधुदुर्ग येथील 64 वर्षीय पुरूष, इस्लामपूर वाळवा येथील 62 वर्षीय पुरूष, शहरातील शिवाजी पार्क येथील 55 वर्षीय पुरूष, पेठवडगाव, हातकणंगले येथील 95 वर्षीय पुरूष, राधानगरी येथील 65 वर्षीय पुरूष, कोतोली पन्हाळा येथील 60 वर्षीय महिला, सरूड शाहूवाडी येथील 85 वर्षीय पुरूष, न्यू महाद्वार रोडवरील 65 वर्षीय पुरूष, सरूड शाहूवाडी येथील 76 वर्षीय पुरूष, बेडकेवाडी खानापूर सांगली येथील 51 वर्षीय पुरूष, गडहिंग्लज येथील 80 वर्षीय पुरूष, चिकोडी येथील 68 वर्षीय पुरूष, वाटेगाव सांगली येथील 70 वर्षीय पुरूष आणि मंडलिक वसाहतीतील 75 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोनाने आजपर्यत 1 हजार 60 जणांचा बळी घेतल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांनी सांगितले. जिल्हय़ात 633 जण कोरोनामुक्त झाल्याने आजपर्यत 22 हजार 744 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 10 हजार 8217 रूग्ण उपचार घेत आहेत.
शहरात गेल्या 24 तासांत 243 नवे रूग्ण दिसून आल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 11 हजार 15 झाली आहे. कोरोना बळींमध्ये ग्रामीण भागात 454, नगरपालिका क्षेत्रात 277, महापालिका क्षेत्रात 270 तर अन्य 58 अशा 10 60 जणांचा समावेश आहे. जिल्हय़ात गेल्या 24 तासांत आजरा 4, भुदरगड 4, चंदगड 15, गडहिंग्लज 27, गगनबावडा 2, हातकणंगले 86, कागल 13, करवीर 90, पन्हाळा 60, राधानगरी 20, शाहूवाडी 2, शिरोळ 43, नगरपालिका क्षेत्रात 62, कोल्हापूर शहर 243 आणि अन्य 69 असे 740 रूग्ण दिसून आले.
एकूण कोरोना पॉझिटिव्ह ः 34630
एकूण कोरोनामुक्त ः 22744
उपचारात ः 10827
कोरोनाचे एकूण बळी ः 1060