प्रतिनिधी / कसबा बीड
कोगे तालुका करवीर येथील हळूहळू कोरोनाचा शिरकाव वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच जवळपास 8 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामध्ये आज आणखीन दोन जणांचा अहवाल पॉझिटिव आल्याने धोका वाढत आहे. हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
जवळपास 45 लोकांचा स्वॅब घेण्यात आला होता. यापैकी आज अखेर दहा लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह व जवळपास 35 लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या भागामध्ये लॉकडाऊन करून आरोग्य सेवक व आशा अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व कोरोना समिती यांच्यामार्फत नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंग, मास्क व आधी नियमाचे पालन करून कोरोनाची संसर्गजन्य साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









