प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुक्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरण व नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काळाम्मावाडी येथील राजर्षी शाहू जलाशय धरणक्षेत्रात गेल्या चोवीस तासात १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण साठवण क्षमतेचा २६ टीएमसीपैकी धरणात १९.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे त्यामुळे धरण ७६.४१ टक्के भरले आहे. आतापर्यंत धरण परिसरात २०६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
काळाम्मावाडीतून वाहणाऱ्या दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून या नदीवरील सुळंबी, तुरंबे आणि कसबा वाळवे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या बंधार्यावरील वहातुक पूर्णपणे बंद झाली आहे.पावसाची अशीच संततधार सुरु राहिली तर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Previous Articleसोलापूर : बार्शीत रामलल्ला भूमिपूजनचे जल्लोषात स्वागत
Next Article जितेंद्र आव्हाड यांचे वाढदिवसानिमित्त प्लाझ्मा दान!








