सांगरूळ / वार्ताहर :
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना करवीर व पन्हाळा तालुक्यातील शिक्षकांचा एकमुखी पाठिंबा देण्यात आला. कोपार्डे (ता.करवीर) येथे करवीर व पन्हाळा तालुक्यातील शिक्षकांचा मेळावा झाला.
यावेळी विधानपरिषद निवडणुकीत शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना एकमुखी पाठिंबा देऊन त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला .यावेळी बोलताना अनु आसगांवकर यांनी शिक्षक मधून प्रा. आसगावकर ,पदवीधर मधून अरुण लाड यांच्या पाठीशी विभागातील संपूर्ण शिक्षक असून सर्वांच्या पाठिंब्यावर दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते ना. हसन मुश्रीफ ,व महा विकास आघाडीचे जिल्ह्याचे सर्व आजी माजी आमदार दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहेत.सर्व शिक्षक व पदवीधर यांनी महा विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रथम पसंतीचे मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन आसगावकर यांनी केले.
महाराष्ट्र स्कूलचे पर्यवेक्षक व शिक्षक नेते उदय पाटील यांनी जिल्ह्यतील मातब्बर उमेदवारांनी माघार घेऊन प्रा. आसगावकर यांना पाठिंबा दिला आहे. यातच आसगावकर यांचे यश निश्चित झाले आहे.अनेक वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला शिक्षक आमदार होण्याची संधी मिळाली आहे. मतदारसंघातील पाच जिल्ह्यात प्रचारात प्रा जयंतआसगावकर हे नंबर १ ला आहेत .मता देखते ही ते नंबर एक लाच असतील असा विश्वास व्यक्त केला.
मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यासह पुणे विभागातून प्रा.जयंत आसगावकर हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील.
स म लोहिया हायस्कूलच्या सविता पाटील म्हणाल्या जिल्ह्याचे मंत्री पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे.यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून महाआघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करावे असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी अनु आसगावकर, बी आर नाळे ,आनंदराव कासोटे, शिक्षक नेते के के पाटील, कोजिमाशी पतसंस्थेचे संचालक समीर घोरपडे, मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील , रंगराव तोरस्कर ,बी बी पाटील, मदन पाटील, पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते.









