ऑनलाईन टीम / कोल्हापूर
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज भाजपने उमेदवारी घोषित केलेल्या सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभुमीवर भाजपच्यावतीने आज रॅली काढण्यात आली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असुन आजच्या रॅलीत नागरिकांचा प्रतिसाद पाहता या विजयावर शिक्का मोर्तब झाल्याचे ते यावेळी म्हणाले. तेसेच बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले कि, माझ्या विरोधकांनी माझ्यावर वारंवार आरोप केला आहे कि, हे कोल्हापुरातुन निवडणून येऊ शकत नाही म्हणुन चंद्रकांत पाटील पुण्याला पळाले असा आरोप माझ्यावर केला आहे. यावर पाटील म्हणाले कि, कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरी आमदाराने राजीनामा द्यावा व आपली जागा मोकळी करावी. पोटनिवडणूक मी लढवतो. मग पाहुयात कोण विजयी होतयं असं ही ते यावेळी म्हणाले.
तसंच थेट पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही असं म्हटलं होतं कि, या शहराला थेट पाणी मिळालं नाही तर मी विधानसभा लढवणार नाही. असं ते म्हणाले होते. तर मग सतेज पाटील यांनी थेट पाईप लाईनचं पाणी कुठे आहे. याचं उत्तर द्यावं. असं ते यावेळी म्हणाले, तसेच विरोधक हे सद्या जनेतेची दिशाभुल करत आहेत. मात्र ही निवडणूक भाजप विकासाच्या मुद्यावर लढवणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यावर विरोधकांच पन्नास वर्षे राज्य होतं. यावेळी त्यांनी काय विकास केला ते दाखवावा. आणि भाजप ही 10 वर्षात काय विकास केला याची लेखी यादी देतो. असं ही ते यावेळी म्हणाले. या रॅलीत जिल्ह्यातील प्रमुख भाजप नेते ही उपस्थित होते.