गोकुळ शिरगाव / वार्ताहर:
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील कांजरभाट वसाहतमधील गावठी दारू भट्ट्या गोकुळ शिरगाव पोलिसांनी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पूर्ण उध्वस्त केल्या असून यामध्ये 36 हजार आठशे रुपये किंमतीचा माल जप्त केला. या मध्ये तीन लोकांच्या वर गुन्हा नोंद केला आहे.
बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास गोकुळ शिरगाव पोलिसांनी उजळाईवाडी येथे कांजारभाट वसाहतीमध्ये अचानक धाड टाकून यामध्ये जमिनीत पुरलेले बॅरेल यामध्ये असलेले कच्चे रसायन असे आठ बॅरल मिळाले असून हे रसायन बेकायदेशीर विनापरवाना कच्चे हातभट्टी दारू बनवण्याकरता वापरत असल्या प्रकरणी सतीश जनार्दन गुमाने, कृष्णा विष्णू गुमाने, कार्तिक अशोक काकडे हे सर्व राहणार उजळाईवाडी (ता. करवीर )या तिघा जणांचे वर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या घटनेचा तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे,









