निविदा प्रक्रियेसाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ
प्रतिनिधी / कोल्हापूर
गवसे ता. आजरा येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी बँकेने महिन्यापूर्वी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार बँकेकडे फक्त एकच निविदा दाखल झाली. त्यामुळे बँकेने निविदा भरण्यासाठी पुढील दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.
बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते. या बैठकीला माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, अनिल पाटील, आर. के. पवार, पी. जी. शिंदे, श्रीमती उदयांनीदेवी साळुंखे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीत पाटील, असिफ फरास, अशोकराव चराटी, प्रताप उर्फ भैय्या माने असे संचालक उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी, थकीत कर्जापोटी बँकेच्या ताब्यात असलेल्या आजरा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. एक महिन्यापूर्वी म्हणजेच २९ जुलै रोजी या निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानुसार पुणे येथील विजन इंडिया सेव्हन प्रोसेसर, डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स या एकच निविदा बँकेकडे दाखल झाली.
बँकेने घेतलेल्या मुदतवाढीच्या निर्णयानुसार दहा सप्टेंबर पर्यंत निविदा अर्जांची विक्री होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर रोजी मीटिंग होणार आहे. १४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत निविदा अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून त्याच दिवशी दीड वाजता निविदा उघडल्या जाणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









