वार्ताहर / गोकुळ शिरगाव
कोल्हापूर ते अहमदाबाद या विमान सेवेचा आज शुभारंभ झाला असून पहिल्याच विमानांमधून ५९ प्रवासी कोल्हापूरला आले असून कोल्हापूर हून अहमदाबादला ५४ प्रवाशांनी प्रयाण केले. सकाळी ठीक अकरा वाजून अकरा मिनिटांनी अहमदाबादहून आलेल्या इंडिको कंपनीच्या विमानाने कोल्हापूर विमानतळावर लँडिंग केले. प्रथेप्रमाणे कोल्हापूर विमानतळावर विमानाचे मान्यवरांच्या उपस्थितीत वॉटर सॅल्यूटने स्वागत करण्यात आले.
इंडिगो एअरलाईन्सच्या कोल्हापूर अहमदाबाद विमान सेवेमुळे कोल्हापुर , इचलकरंजी, कराड व सातारा येथील व्यापारी व उद्योजकांची मोठी सोय झाली असून विमान सेवेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता सदर विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू करण्याचे सूतोवाच विमानतळ प्रशासन व खासदार संजय मंडलिक यांनी केले.
यावेळी कोल्हापूर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले तसेच बऱ्याच वर्षापासून मागणीअसलेली अहमदाबाद विमानसेवा सुरू झाल्याचा आनंद असून विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. तसेच विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानतळावरील विकासकामांना अधिकाधिक गतीमान करण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले विमानतळाच्या विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया यांनी विकासासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मंत्री खासदार आमदार चेंबर ऑफ कॉमर्सचे व कमिटीचे सदस्य यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी अहमदाबाद साठी प्रथम प्रवासी म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एग्रीकल्चर चे ललित गांधी यांनी प्रवास केला. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कुमार कटारिया, अॅड. सुरेश कुराडे, विजय अग्रवाल, विज्ञान मुंडे, अमर गांधी, अमित हुक्केरी, विजय घाडगे, विक्रांत सिंह कदम, इंडिगो एअरलाइन्सचे एअरपोर्ट मॅनेजर विशाल भार्गव आदी मान्यवर उपस्थित होते.
तिरुपती कोल्हापूर तिरुपती विमान सेवा ही सुरू
कोल्हापूर विमानतळावरून कोरोणा संसर्गामुळे खंडित झालेली तिरुपती मार्गावरील विमानसेवा आजपासून सुरू झाली असून या विमान सेवेलाही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.