प्रतिनिधी/असळज
गेल्या दोन ते तीन दिवसापासून सायंकाळनंतर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर दिवसभर ढगाळ वातावरण आहे. यामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गगनबावडा तालुक्यात जोरदार अनपेक्षित पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली आहे. असून जनावरांचे गवत, खते, ऊस यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या पावसामुळे अगोदरच उल्हास त्यात फाल्गुन मास” अशी अवस्था शेतकरी वर्गाची पावसाने झाली आहे. शेतातील कामे खोळबल्याने मजूर खर्चाने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. जनावरांचा सुका चारा रानातच भिजला गेल्याने शेतकऱ्यांना पावसाळी हंगामाची चिंता वाढली आहे. शेतात ऊस पिकासाठी ठेवलेले खत पावसाने भिजल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. ऊस कारखान्याला घालवण्याची चिंता असणाऱ्या शेतकऱ्यांची ऊस तोडणी थांबली असल्याने तोडलेला ऊस तिथेच अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









