ऑस्ट्रलियावरून भारतात आल्यानंतर पहिला अहवाल निगेटिव्ह, आठ दिवसानंतर कोल्हापुरात आल्यावर कोरोना पॉझिटिव्ह, कुटूंबातील चौघांचे अहवाल निगोटिव्ह
प्रतिनिधी / कोल्हापूर
ऑस्ट्रेलियाहून कोल्हापुरात आलेल्या एका दहा वर्षाचा बालकाचा कोरोनाचा अहवाला पॉझिटिव्ह आला आहे. परदेशातून आलेल्या नागरिक कोरोना बाधित झाल्यास त्यास ओमिक्रोन संशयित म्हणून उपचार दिले जातात. त्या बालकाचा स्वॅब पुढील तपासासाठी पुण्याकडे पाठविण्यात येणार आहे. दोन दिवसांत अहवाल आल्यानंतर ओमिक्रोन आहे की नाही हे स्पष्ट होणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरा लाट नियंत्रणात आली होती. असे असतानाच कोरोनाच्या नवीन ओमिक्रोन व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला. या आजाराचा राज्यात डोंबीवलीमध्ये पहिला रूग्ण सापडला. यानंतर पुण्यातही रूग्ण आढळून आले. आतापर्यंत कोल्हापूरमध्ये एकही ओमिक्रोनचा रूग्ण नव्हता. मात्र, पितळी गणपती परिसरातील एक कुटूंब 3 डिसेंबर रोजी ऑस्ट्रोलियाहून भारतात आले. त्यातील दहा वर्षाचा एक बालक ओमिक्रोन संशयित आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
पहिला अहवाल निगेटीव्ह
पितळी गणपती परिसरातील पाच जणांचे कुटूंबिय 3 डिसेंबर रोज भारतात आल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यावेळी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. रविवारी कोल्हापुरात आल्यानंतर त्यांचे पुन्हा स्वॅब घेतले. सोमवारी त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून चार जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटीव्ह आले तर त्यांच्यापैकी दहा वर्षाच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
ओमिक्रोनची शक्यता कमी
रमणमळा येथील कुटूंबिय भारतात आल्यानंतर आठ दिवसांनी कोल्हापुरात आले. यानंतर त्यांच्यातील एका बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर ओमिक्रोनचा प्रादुर्भाव असणाऱ्या 11 देशामध्ये ऑस्ट्रोलियाचा समावेश नाही. त्यामुळे संबंधिताला ओमिक्रोनची शक्यता कमी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तरीही खबरदारी म्हणून स्वॅब ओमिक्रोनच्या तपासणीसाठी पुण्याला पाठविला जाणार आहे.