कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची संख्या सातशे पार गेलीय. आज रात्री दहा वाजेपर्यंत सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील साळुंके नगर परिसरातील मोरे माने नगर येथील 63 वर्षीय पुरुष, करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथील 50 वर्षीय महिला, पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील 56 वर्षे पुरुष, नावली येथील 31 वर्षीय तरुण, गडिंग्लज तालुक्यातील वडाचीवाडी येथील 59 वर्षीय पुरुष आणि हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील 76 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 701 वर पोहोचली आहे.








