प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहर व उपनगरांमधील रहिवाशी कुटुंबाना भाजीपाला घरपोच देण्यात येणार आहे. नॅचरल फार्म्स या नावाने शेतकरी उत्पादक कंपनी तयार करुन त्याची नाबार्ड व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या मार्फत नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली.
सध्या जगावर कोरोना विषाणूचे संकट घोंगावत आहे. शेतकऱ्यांच्या मालाची विक्री व्हावी व ग्राहकांनाही किफायतशीर किमतीत भाजीपाला मिळावा. या उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपनी व जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांच्या सहकार्याने शहरामधे सर्व नियमांचे पालन करुन शेतकऱ्याचा भाजीपाला व फळे खालील घरपोच देण्याची व्यवस्था केलेली आहे.
www.thenaturalfarms.com या लिंकवरून अॅपच्या आधारे ग्राहकांना भाजीपाला मागवता येणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा व कोरोना विरुध्द लढण्यास सहकार्य करावे, असे आवाहन समन्वयक विकास पाटील यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








