ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यातच सरकारकडून आता कोरोना संदर्भातील अधिकृत माहिती देण्यासाठी दिल्ली सरकारने @Delhi Vs Corona हे विशेष ट्विटर हॅंडल सुरू केले आहे.
यावर कोरोना संदर्भातील प्रश्न आणि तक्रारींचे समाधान केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका टीमची नियुक्ती देखील केली आहे. ही टीम सरकारी हॉस्पिटल मधील कोरोना च्या स्थितीची माहिती घेईल आणि त्याची अधिकृत माहिती जनतेला देईल.
तसेच कोरोना रुग्ण, त्यांचा परिवार तसेच अन्य नागरिकांना या ट्विटर हॅंडल द्वारे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत. ही टीम नियमितपणे डॉक्टर, आरोग्य पथक यांच्या संपर्कात राहून काम करणार आहे.
कोरोनाशी निगडित विविध प्रश्न या ट्विटर हॅंडल टॅग करून नागरिक विचारू शकतील आणि या सर्व प्रश्नांची दाखल घेऊन उत्तरे देण्यात येतील असे ही सरकारकडून सांगण्यात आले आहे.









