हरमल सरपंच मनीषा कोरकरणर यांचे आवाहन
वार्ताहर / हरमल
कोविड 19 च्या थैमानामुळे जनता बेहाल व चिंताग्रस्त बनली आहे. महाराष्ट्र व अन्य ठिकाणी दरदिनी वाढत्या रुग्ण संख्येमुळे सुरक्षित गोव्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी लागतील. त्यासाठी पंच सदस्य व ग्रामस्थानी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच मनीषा नाईक कोरकणकर यांनी केले आहे.
हरमल पंचायत मंडळ व ग्राम विकास समितीची संयुक्त बैठक सरपंच मनीषा कोरकणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. गोवा सार्वजनिक प्रशासन व ग्राम विकास संस्था व पंचायत राज्य संस्था, ह्यांनी ’कोविड 19ःआव्हाने व पुढील मार्ग’,ह्याविषयीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.पंचायत सचिव दशरथ परब यांनी बैठकीचा उदेश सांगितला.गावातील पंचायतीसमोर आरोग्य, आर्थिक व सामाजिक आव्हाने पेलण्यासाठी तयारी व योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. शाळा,अंगणवाडी, रेशन दुकाने,पंचायत कार्यालय,बस स्टॉप व अन्य सार्वजनिक स्थळावर फोगिंग व स्वच्छता राखण्याचे उपाय ठरविले आहेत.
कित्येक जणांकडून सामाजिक अंतराचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांसाठी सूचना वजा फलक उभारण्याचे ठरविले आहे. आरोग्य खात्याच्या सहकार्याने गावांतील मोक्मयाच्या ठिकाणी मलेरिया व अन्य आजार रोखण्यासाठी औषध फवारणी व लसीकरण योजना राबविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे ठरले.
प्रत्येक प्रभागातील जे÷य नागरिकांची माहिती,त्यांचे आरोग्यविषयक शिष्टाचार,सुशिक्षित बेरोजगाराची माहिती,त्याना मलमपट्टी,रक्त तपासणी,इंजेक्शन देणे व अन्य निम्नवैधकीय सेवा देण्यासाठी प्रशिक्षित करणे व त्यांची आपत्कालीन वेळेत मदत घेणे,कोविड विषयक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून इन्त्यभूत माहिती संकलित करण्याचे ठरविले.लॉकडाऊन काळात स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त काम केले आहे व भविष्यात तशी परिस्थिती उद्भवल्यास स्वयंसेवक तत्पर आहेत, असे सरपंच कोरकणकर यांनी सांगितले. आर्थिकदृष्टय़ा स्वयंनिर्भरता येण्यासाठी शेतकरी वर्गाला प्रोत्साहित करणे व त्यांच्या मालाला बाजारपेठ देण्याचे ठरले.
पंचायतीच्या 14 व्या व 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून सॅनिटाइझ व पाणी टंचाई समस्या निकाली करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.कित्येक प्रभागातील गटार,पाणी तुंबण्याची जागा,साकव तसेच सखल भाग आदींचा समावेश आहे.त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची संधी आहे.सध्या पावसाळा नजीक ठेपल्याने नवीन गटार बांधकामे होणार नाहीत.मात्र ग्रामविकास आराखडय़ातील नियोजित कामाच्या यादीत, गटारे व अन्य विकासकामे मंजुरीसाठी पाठविली आहेत,असे सचिव परब यांनी सांगितले.पाणी टंचाईबाबत,कोरकण धरणातून रस्तामार्गे पाईपलाईन टाकून,प्रक्रियेनंतर पाणी भोम टाकीत नेण्याची सुचना करण्यात आली.
मनुष्यबळ माहिती यादी तयार करू —–
यावेळी परप्रांतीय मजुरलोक गावी गेले आहेत,तर कित्येक जण प्रतीक्षेत आहेत,मात्र काही जण इथेच थांबणार असल्याने त्यांची माहिती गोळा करण्याची सूचना केली.गावांतील स्वयंरोजगार युवकांची ज्यात फिटर,इलेक्टिशियन,प्लमबर,सुतार यांची यादी तसेच विद्यार्थायची माहिती,एकटय़ा दुकटय़ा जे÷य नागरिकांची माहिती,गावातील संस्था,क्लबस,उच्च अधिकारी,अग्निशमन व आपत्कालीन सेवाविषयक माहिती तयार ठेवल्यास अडचणीवेळी मदत होते.गावांत अनोळखी व्यक्ती वा कुटुंबे दिसल्यास त्वरित संपर्क साधावा,असे आवाहन सरपंच कोरकणकर यांनी केले.
या बैठकीला पंच इनासियो डिसौझा,बेर्णांड फेर्नांडिस, प्रतीक्षा नाईक,मनोहर केरकर,नियुक्त पंच सज्जन हरमलकर,ग्रामविकास समितीचे निमंत्रक चंद्रहास दाभोलकर उपस्थित होते.शेवटी सरपंच मनीषा नाईक कोरकणकर यांनी आभार मानले.









