ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर रिलायन्स कंपनीने आपल्या कर्मचाऱयांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आपल्या कोणत्याही कर्मचाऱयास आर्थिक ताण बसू नये म्हणून ज्यांचे मासिक उत्पन्न तीस हजारपेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱयांना पुढील काळात दुप्पट वेतन देण्याची घोषणा केली आहे.
या निर्णयाची माहिती देण्यासाठी रिलायन्सने एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की मासिक वेतन तीस हजारपेक्षा कमी असणाऱया रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱयांना या महिन्यात दुप्पट वेतन दिले जाईल. यामागे त्यांचा आर्थिक व्यवहार नियमित सुरू रहावा व आर्थिक भार कमी व्हावा, असा उद्देश आहे.









