ऑनलाईन टीम / मुंबई :
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) भारतीय नागरिकांना सामाजिक संपर्क कमी करण्यासाठी आणि पर्यायाने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी डिजिटल पेमेंट्सचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या लॉकडाउन परिस्थितीमध्ये बँका आणि संबंधित क्षेत्रातील भागिदारांच्या मदतीने प्रत्येक नागरिकाला मजबूत डिजिटल पेमेंट पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मदत करण्यासाठी एनपीसीआय बांधिल आहे.
सध्याच्या लॉकडाउन परिस्थितीमध्ये आम्ही नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन करत आहोत. अत्यावश्यक वस्तूंचे सेवा पुरवठादार आणि नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी डिजिटल पेमेंट पर्यायांचा वापर करण्याची विनंती आम्ही करत आहोत, असे एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलिप आस्बे यांनी सांगितले.
आमचे व्यवसायातील सातत्य राखण्याचे नियोजन लवचिक आहे आणि कोविद- 19 मुळे तयार झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सर्व पेमेंट यंत्रणांमध्ये आम्ही आवश्यक बदल केले आहेत. विशेषतः युनायटेड पेमेंट्स इंटरफेज (युपीआय) प्लॅटफॉर्मवर येणारा अतिरिक्त ताण आणि आव्हाने हाताळण्यासाठी तंत्रज्ञान पायाभूत सुविधा जास्त सक्षम बनवण्यात आल्या आहेत. यामुळे युजर्सना डिजिटल व्यवहार करताना फायदे, सोपेपणा आणि सुरक्षा मिळणे शक्मय झाले आहे, असेही आस्बे यांनी नमूद केले.