मुंबईत कोरोनाचा कहर जास्त आहे. मुंबईत तर रुग्णांसाठी जागाही कमी पडली असल्याने प्रसंगी हॉटेल्स, क्लब, जिमखाने, खासगी रुग्णालये, छोटे स्टेडियम आदी ठिकाणच्या जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तेथे रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जगभरात थैमान घालणाऱया कोरोनाने मुंबईसह महाराष्ट्राला सोडलेले नाही. संपूर्ण भारतात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाने चीनमध्ये 3500 पेक्षाही जास्त बळी घेतले. हिंदी-चिनी भाई भाई असा दिशाभूल करणारा नारा देत भारताच्या पाठीत खंजीर खुपसणाऱया चीनने यामागे काही षड्यंत्र रचले असेलही. भारताच्या हद्दीत घुसखोरी करून काही प्रदेश ताब्यात घेतला आणि आता अरुणाचल प्रदेश घशात घालण्याचे कारस्थान चीनकडून सुरू आहे. दुसरीकडे पाकिस्तानला उघड मदत करून भारतात छुपे युद्ध करायचे, त्यासाठी दहशतवादी संघटनांना शास्त्रसाठा पुरविणे, भारतीय सीमेवर खदखद निर्माण करणे हा चीनचा आवडता पेशा आहे. त्यामुळे चीनपासून भारताने नेहमीच सावध राहायला पाहिजे.
चीनवर कोरोनाबाबत मोठा संशय घेण्याचे कारण म्हणजे, जो चीन देश कोरोनाबरोबर दोन हात करतो आहे तोच चीन कोरोना शंभर टक्के नियंत्रणात आलेला नसताना मास्कची निर्यात दुसऱया देशात करतो. आपल्या स्वत:च्या देशात जर कोरोना अधिक पसरला तर आपल्या लोकांसाठी मास्कचा तेवढा साठा आहे का, याची काळजी चीनने करायला हवी होती. भारताने बलाढय़ राष्ट्रांच्या तुलनेत तशी संपूर्ण तयारी केलेली नसावी. त्याचप्रमाणे चीनने जैविक युद्धाची तयारीही केलेली आहे. त्याचाच एक भाग कोरोना असल्याचे बोलले जात आहे.
चीनमध्ये कोरोनाची सुरुवात झाल्यापासून तेव्हापासून ते मार्चअखेरपर्यंत म्हणजे कोरोना नियंत्रणात येईपर्यंत जग चीनकडे बघत होते. चीनमध्ये कोरोना नियंत्रणात आला आणि जगभरात थैमान घालत आहे. अशावेळी चीन संपूर्ण जगाकडे बघत आहे. आज जगात 18 लाखांपेक्षाही जास्त कोरोना केसेस आहेत. त्यात 13 लाख कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंत जगभरात 1 लाखापेक्षाही जास्त लोकांचा मफत्यू झाला आहे.
कोरोनाने इटली, अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. मात्र, त्या तुलनेत रशिया, दक्षिण कोरिया या देशात कोरोनाचा अधिक प्रभाव जाणवत नाही, याचेही उत्तर शोधणे आवश्यक आहे.
चीनची करडी नजर असलेल्या भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईतही कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत भारतात 31 राज्यात कोरोनाच्या 9 हजारापर्यंत केसेस आढळून आल्या आहेत. 331 जणांचा मफत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1982 कोरोनाबाधित असून 149 लोकांचा मफत्यू झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आतापर्यंत 1,399 कोरोनाबाधित आढळून आले असून यामध्ये 91 जणांचा मफत्यू झाला आहे. देशातील मफतांची संख्या पाहता एकटय़ा मुंबईत 30 टक्क्यांपेक्षाही जास्त लोकांचा मफत्यू झाला आहे.
भारत सरकार व महाराष्ट्र आणि अन्य राज्यांनी जी उपाययोजना केली, त्यामुळे जगातील काही देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा मोठा फैलाव झाला नाही अथवा तो नियंत्रणात आहे. या आपत्तीत भारत, महाराष्ट्र आणि इतर राज्यात लॉकडाऊन केल्याने परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आहे. मात्र, चीनमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असतानाच भारताने पूर्वतयारी केली असती तर आज भारतात कोरोना रुग्णांची व मफतांची संख्या ही निश्चितच अत्यल्प असती.
मुंबईत कोरोनाचा कहर जास्त आहे. मुंबईत तर रुग्णांसाठी जागाही कमी पडली असल्याने प्रसंगी हॉटेल्स, क्लब, जिमखाने, खासगी रुग्णालये, छोटे स्टेडियम आदी ठिकाणच्या जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तेथे रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे डॉक्टर, नर्स, वार्डबॉय यासह साधनसामग्री, किट आदींची कमतरता भासत आहे. त्यामुळेच आता पालिकेने वार्डबॉयच्या रिक्त जागा भरण्यास सुरुवात केली. खासगी डॉक्टरांची मदत कोरोना क्रिनिंगसाठी घेण्यात येत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता भारताने यातून चांगलाच धडा घेतला पाहिजे. भविष्यात जैविक हल्ला झाल्यास काय उपाययोजना करावी लागेल, याची पूर्वतयारी करण्याचा सराव यातून होत आहे. तेव्हा भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास त्याला तोंड कसे द्यायचे हेच यामधून शिकायला मिळत आहे.
मारुती मोरे








