प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कारोनापासून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असतानाच खेड तालुक्यातील 65 वर्षी वृद्धाचा कारानामुळे मृत्यू झाल़ा यामुळे जिह्यातील मृतांची संख्या 318 इतकी झाली आह़े सोमवारी नव्याने केवळ 6 रूग्ण आढळून आले आहेत़ तर 13 कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े
जिह्यामध्ये सोमवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 4 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 2 कारोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ सर्व रूग्ण रत्नागिरी तालुक्याच आढळून आले आहेत़ जिह्यातील एकूण कारोना बाधितांची संख्या 8 हजार 531 इतकी झाली आह़े सोमवारी कोरोनापासून बरे झालेल्या 13 रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 8 हजार 60 इतकी झाली आह़े जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.47 इतके आह़े
मृतांच्या तालुकानियाह आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 87, खेड 51, गुहागर 12, दापोली 32, चिपळूण 75, संगमेश्वर 33, लांजा 11, राजापूर 14 तर मंडणगडमध्ये 3 असे एकूण 318 जणांचा आतापर्यंत कारोनामुळे मृत्ये झाला आह़े









