उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
प्रतिनिधी/मुंबई
कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे, अशा अकृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या निर्णयामुळे पालक गमावलेल्या पाल्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱया लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. आई वडीलांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याने अनेक जण अनाथ झाले आहेत. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील कुलगुरुंसोबत शुल्काबाबत मंत्री सामंत यांची आकारण्यात येणारे टÎूशन फी वगळता इतर फी मध्ये सुट देणे शक्य आहे काय यावर सकारात्मक चर्चा होऊन फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील प्रत्ये विद्यापीठाची फी आकारण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे नेमकी फिमध्ये किती सवलत मिळणार यावर उद्या चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.








