अमेरिकेच्या सीडीसी संस्थेने केले संशोधन
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
दिवसेंदिवस जगात कोरोना विषाणूचे थैमान वाढत असताना अमेरिकेच्या सेंटर फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शन (सीडीसी) या संस्थेने कोरोनाच्या रोगाची आणखी सहा लक्षणे शोधून काढली आहेत. त्यात स्नायूदुखी आणि चव किंवा वासाची जाणीव नाहीशी होणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
यापूर्वी ताप येणे, सारखा कोरडा खोकला येणे आणि नाक गळणे (सर्दी), अतिसार, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, इत्यादी लक्षणे सांगण्यात येत होती. मात्र केल्या महिन्याभराच्या सखोल संशोधनानंतर त्यांच्यात आणखी सहा लक्षणांची भर पडली आहे. याही लक्षणांचा विचार केल्यास कोरोनाचा संसर्ग अधिक लवकर शोधता येईल, असा संस्थेचा दावा आहे.
स्नायूदुखी, चव व वासाची जाणीव नाहीशी होणे याबरोबरच थंडी भरणे (चिल्स), सातत्याने थंडी भरून शरीर थरथरणे (रिपिटेड शेकिंग विथ चिल्स), डोकेदुखी आणि घसा सुजणे या चार लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर 2 ते 14 दिवसांमध्ये ही लक्षण दिसू लागतात, असे संस्थेचे म्हणणे आहे.
मात्र ही सूचीसुद्धा परीपूर्ण नाही. कोरोनाची आणखीही लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे ज्या लक्षणांमुळे आपल्याला अस्वस्थ वाटते, किंवा जी लक्षणे तीव्रपणे दिसून येतात, त्याच्या संदर्भात त्वरित डॉक्टरला भेटावे, असाही दक्षतेचा उपाय संस्थेने स्पष्ट केला आहे.
अशी आहेत नवी लक्षणे…
ड अंगात थंडी भरणे किंवा चिल्स
2. नेहमी थंडी भरून अंग कापणे, थरथरणे
3. डोकेदुखी, असहय़ डोकेदुखी व वेदना
4. स्नायूदुखी (संधीवाताच्या व्यतिरिक्त)









