- राज्यात आजपासून 8 जून पर्यंत कडक निर्बंध!
ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये वाढत असलेली कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 24 मे ते 8 जून दरम्यान राज्यात ‘त्रिस्तरीय लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ‘त्रिस्तरीय लॉकडाऊन’ मध्ये आवश्यक सेवा सोडून बाजार शुक्रवार 28 मेच्या दुपारी 12 वाजल्यापासून ते मंगळवार 1 जूनच्या सकाळी 5 वाजेपर्यंत आणि शुक्रवार 4 जूनच्या दुपारी 12 वाजल्यापासून ते मंगळवार 8 जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद असणार आहेत.

यासोबतच बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना 72 तासाच्या आत केलेली आरटी – पीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट जमा करणे आवश्यक आहे. जर एखाद्या प्रवाशाने रिपोर्ट जमा न केल्यास संबंधित प्रवाश्यास 15 दिवस क्वारंटाइन रहावे लागणार आहे.
- विवाह समारंभास 30 जूनपर्यंत स्थगिती
राज्यात 30 जून पर्यंत विवाह समारंभास स्थगिती देण्यात आली आहे. विवाह संबधित कोणतेही कार्यक्रम करण्यास मनाई असणार आहे. लग्न घरच्या घरी किंवा कोर्ट मॅरेजच्या रुपात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये केवळ 11 नागरिक सहभाग घेऊ शकतील. तसेच याबाबतची सूचना gov.in वर किंवा हेल्पलाईन नंबर 181 वर देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- दंड राशीत वाढ
सार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी मास्क नाही घातल्यास आकारल्या जाणाऱ्या दंड राशीमध्ये वाढ करण्यात आली आहे. मास्क न घातल्यास यापूर्वी 500 रुपये दंड वसूल केला जात असे आता यामध्ये वाढ करण्यात आली असून 1 हजार रुपये दंड वसूल केला जाईल. तसेच सोशल सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.









