ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यातच मागील 24 तासात देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण 33 हजार 695 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 606 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 9 लाख 68 हजार 876 वर पोहचली असून, मृतांची संख्या 24 हजार 915 एवढी आहे.

सध्या देशात 3 लाख 31 हजार 146 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 6 लाख 12 हजार 815 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदद्वारे देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात 15 जुलैपर्यंत जवळपास 1 कोटी 27 लाख 39 हजार 490 नमुने तपासण्यात आले. त्यातील 3 लाख 26 हजार 826 नमुन्यांचे परीक्षण मागील 24 तासात करण्यात आले आहे.

भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.24 टक्क्यांनी वाढून 96.9 टक्के झाले आहे. तर मृतांचे प्रमाण 3.91 टक्के आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 2 लाख 75 हजार 640 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 1 लाख 16 हजार 993, गुजरातमध्ये 44 हजार 552, मध्यप्रदेश 19 हजार 05, आंध्र प्रदेश 35 हजार 451, बिहार 20 हजार 612 तर पश्चिम बंगालमध्ये 32 हजार 838 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत









