ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना विषाणूच्या संसर्गाने उत्तराखंड सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, यंदाची कावड यात्रा रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कावड यात्रेसंबंधी सचिवालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

कोरोनाचा डेल्टा प्लस वेरियंट, तिसऱ्या लाटेची शक्यता आणि देश-विदेशातील दुष्परिणामांवर सखोल चर्चा आणि सल्लामसलत करण्यात आली. यासंबंधी तज्ज्ञांच्या सल्ल्याचाही विचार करण्यात आला.
दरम्यान, नागरिकांच्या जीवाच्या कावड यात्रा रद्द करण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. कावड यात्रा रद्द होणार का? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना विचारण्यात आला होता.
नागरिकांचे जीवा जावेत असे देवालाही नको आहे. सध्याच्या स्थिती नागरिकांचे जीव वाचवण्याला प्राधान्य आहे, असे उत्तर धामी यांनी त्यावेळी दिले होतो.
इंडियन मेडिलकल असोसिएशनने सोमवारी मुख्यमंत्री धामी यांना पत्र लिहिले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता राज्यातील कावड यात्रा यंदा रद्द करण्यात यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली होती.









