प्रतिनिधी / पणजी :
कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय असलेला तिसरा रुग्ण गोमेकॉत दाखल झाला आहे. एकूण तीन रुग्ण गोमेकॉत दाखल झाले असून त्यांना वेगळय़ा वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. गुरुवारी एका ब्रिटीश नागरिकाला संशयावरून गोमेकॉत दाखल केले तर मंगळवारी दोघांना दाखल केले होते.
भारतातही आता कोरोनाचे रुग्ण सापडल्याने गोव्यात सतर्कता बाळगली जात आहे. गोमेकॉत वेगळय़ा वॉर्डमध्ये अशा रुग्णांना ठेवण्यात येत आहे. यासाठी 10 खाटांची व्यवस्था असलेला वॉर्ड तयार करण्यात आला आहे. आरोग्य खातेही सतर्क झाले असून कोरोना व्हायरसबाबत आढावा बैठका घेतल्या जात आहेत.