संसर्गमुक्त झालेले 20 टक्के लोक 90 दिवसांमध्ये मानसिक आजाराला जाताहेत सामोरे
कोरोनातून बरे झालेले लोक आता मानसिक आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचा खुलासा द लॅन्सेट सायकियाट्रिक जर्नलमध्ये प्रसिद्ध अध्ययनात करण्यात आला आहे. कोरोनातून बरे झालेले सुमारे 20 टक्के लोक 90 दिवसांच्या आत सायकियाट्रिक डिसऑर्डरचे शिकार ठरले आहेत. कोविड-19 नंतर होत असलेल्या मानसिक आजारासाठी नव्या उपचारपद्धतीची ओळख पटविणे गरजेचे असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
मानसिक आजारांना तोंड देणाऱया रुग्णांमध्ये चिंता, नैराश्य आणि अनिद्रा सर्वात सामान्य लक्षण आहे. याचबरोबर रुग्णांना डिमेंशिया, मानसिक कमजोरी यासारख्याही अडचणी येत आहेत. जगभरातील डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी याच्या कारणांचा त्वरित शोध लावण्याची गरज असल्याचे ऑक्सफोर्ड विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक आणि अध्ययनाचे लेखक पॉल हॅरिसन यांनी म्हटले आहे.
अध्ययनात हजारो लोक सामील
या अध्ययनात अमेरिकेतील 69 हजार लोक सामील झाले होते. यात त्यांच्या इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्डचे विश्लेषण करण्यात आले आहे. यातील 62 हजारांपेक्षा अधिक जण कोरोनातून मुक्त झाले होते. प्रत्येक 5 पैकी 1 व्यक्ती कोरोनाबाधित पुढील 3 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच चिंता, नैराश्य किंवा निद्रानाशाचा शिकार ठरल्याचे यात आढळून आले आहे. पूर्वीपासून मानसिक आजारांना सामोरे जाणाऱया लोकांमध्ये कोरोना होण्याची शक्यता 65 टक्के अधिक होती, असेही दिसून आले आहे.
संभाव्य कारणे
लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याची लक्षणे दिसण्याची दोन मोठी कारणे असू शकतो. हा विषाणू इम्युन सिस्टीमद्वारे थेट मानवी मेंदूला हानी पोहोचवू शकतो आणि याचमुळे लोक मानसिकदृष्टय़ा आजारी होत आहे. तसेच कोरोना होण्याचा अनुभव आणि पोस्ट कोविड सिंड्रोमच्या भीतीमुळेही लोक चिंतेत असू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
चिंतेचे प्रेरणेत रुपांतर शक्य
कोरोनाचे धोके आणि नकारात्मक परिणामांसंबंधी तणाव असणे आता सर्वसामान्य ठरले आहे, परंतु या गोष्टी पुढील तयारींना प्रभावित करू शकतात. चिंतेला स्वतःची प्रेरणा, व्यूहनीति आणि नियोजनासाठी वापरता येऊ शकते. चिंता करणे सामान्य बाब असली तरीही त्या चिंतेत पुढील नियोजन आणि स्वतःला प्रेरित करण्याची शक्यता असावी. चिंतेदरम्यान कुठल्याही गोष्टीच्या सर्व पैलू समजून घेण्यास आम्ही 100 टक्के देतो, असे उद्गार मानसोपचारतज्ञ लिझाबेथ रोमर यांनी काढले आहेत.
चिंता, तणावाचा इम्युनिटीवरही प्रभाव
अमेरिकन आरोग्य यंत्रणा सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार खबरदारी बाळगत असल्यास चिंता करण्याची गरज नाही. अधिक चिंता आरोग्यालाही नुकसान पोहोचवू शकते. याचा प्रभाव इम्युनिटी आणि मेटाबॉलिज्मवर पडतो. अशा स्थितीत मन शांत ठेवणे अधिक आवश्यक आहे.
सीडीसीच्या 5 सूचना सहाय्यभूत
संक्रमणाविषयी कमी विचार करा : स्वतःचे काम आणि प्रवासादरम्यान संक्रमण होण्याची भीती सतावू शकते, परंतु भीती तणाव वाढविणार असल्याने संक्रमणाविषयी अधिक विचार करू नका.
मेंदूला कमी व्यग्र ठेवा : स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या गरजांविषयी विचार करणे चांगली बाब आहे, परंतु कामादरम्यान मेंदूला यात गुंतविणे योग्य नाही. यातून मानसिक त्रास वाढणार आहे.
काम पूर्ण न झाल्याचा दोष घेऊ नका : कार्यालयात अधिक काळानंतर परतत असल्यास तुम्हाला वातावरण वेगळे वाटू शकते. महामारीमुळे कामात बदल झाला असेल आणि स्वरुपही बदलले असू शकते. याचबरोबर काम पूर्ण न करण्याची भावना तुमच्या तणावात वाढ करू शकते.
नोकरीसंबंधी अधिक विचार नको : सद्यकाळात प्रत्येक जण अडचणींना सामोरा जात आहे, स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु नोकरी विषयी अधिक आणि वारंवार विचार करणे मानसिक प्रकृतीसाठी योग्य नाही.
नव्या गोष्टी शिका, घाबरू नका : कोरोनामुळे कार्यालय आणि जीवनात अनेक नव्या गोष्टी सामील झाल्या आहेत. नव्या गोष्टी शिकणे आणि त्यांचा योग्य वापर करण्यावरून चिंताही असू शकते. परंतु घाबरायचे असून शिकायचे आहे.









