वाठार किरोली / प्रतिनिधी
रहिमतपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असताना नगरपालिका, अनेक सामाजिक संस्था, रुग्णालये विविध उपक्रमातून रुग्णांसाठी पुढे आले आहेत, गरजूंना मदत देणे हेच ध्येय सर्वांचे आहे. मात्र पवार गल्ली सारख्या एका छोट्या विभागानेही या लढ्यात आम्हीही कुठे कमी नाही हे दाखवत एक ऑक्सिजन मशीन व काही उपयुक्त तपासणी उपकरणे खरेदी करून कोरोना विरोधी लढ्यात एक माणूसकीचा हात दिला आहे.
पवार गल्लीतील सर्व युवक व रहिवाशांना अवघ्या व्हॉट्सप मेसेज वरून आवाहन करीत आपल्या विभागातील कोरोना बाधितांना संजीवनी देण्यासाठी चक्क एका दिवसातच लोकवर्गणी जमवून एक अत्याधुनिक ऑक्सिजन मशीन खरेदी करून त्याचे लोकार्पणही करण्यात आले.
सामाजिक जाणीव कायम ठेवत पवार गल्लीतील सर्व नागरिक एकमेकांच्या सुख दुःखात नेहमीच सहभागी होत असतात, कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र येत गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ऑक्सिजन मशीन खरेदी करून पुन्हा एकदा रहिमतपूरकरांना आपल्या विधायकतेची ओळख करून दिली आहे. पवार गल्लीने दिलेल्या या सामाजिक योगदानाचे विशेष कौतुक केले जात आहे.
या लोकार्पण समारंभास सुनिल पवार, संजय पवार,सुभाष जाधव,भिमराव पवार, विकास पवार, दिलीप पवार, संदीप भोसले, दिलीप खंडेराव पवार,श्रीकांत मोरे, राजेंद्र पवार, राजेंद्र भोसले, विठ्ठल पवार, विजय भोसले, मोहन सावंत, रणजित पवार, शंकर मोरे, अजित माने, आदित्य बागल,दीपक जाधव सुजित पवार, सुशील पवार, गुरुदत्त पवार, संतोष पवार,संजय मोरे, सचिन सावळाराम पवार,विजय काजळे,विजय भोईटे, नितीन पवार,महेश जमदाडे, सुनील अर्जुन पवार, मनोज पवार,विजय बबन पवार,अजय पवार, विक्रम पवार, प्रवीण पवार, विजय बाबूराव पवार,श्रीकांत कोरे आदी उपस्थित होते.









