ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
ब्रिटनने मागील आठवड्यात फायझर-बायोएनटेकच्या लसीच्या वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे लसीच्या वापराला परवानगी देणारा हा जगातील पहिला देश ठरला आहे. विशेष म्हणजे या लसीचा जगातील पहिला डोस भारतीय वंशाच्या व्यक्तीला दिला जाणार आहे.
फायझर-बायोएनटेकच्या लसीकरणाला आजपासून ब्रिटनमध्ये सुरुवात होत आहे. भारतीय वंशाच्या 87 वर्षीय हरी शुक्ला यांना न्यूकॅसमधील एका रुग्णालयात ही लस सर्वप्रथम देण्यात येणार आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानंतर लस घेण्याआधी हरी शुक्ला यांनी आपल्या भावना व्यक्त व्यक्त केल्या. कोरोना विरोधातील या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक आहे. लसीचे पहिले दोन डोस घेणे हे आपले पहिले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉक्टर्स, आरोग्य सेवक आणि 80 वर्षांवरील नागरिकांना यांना सुरुवातीच्या टप्प्यात ही लस देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून या लसीच्या 8 लाख कुप्या उपलब्ध होणार असून, सरकारने 4 कोटी कुप्यांची मागणी केली आहे.