ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
पाश्चिमात्य देश कोरोनावरील लस तयार करण्यात व्यस्त असताना चीन अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी चीन घातपाताची तयारीही करत असल्याचा आरोप अमेरिकेचे सिनेट सदस्य रिक स्कॉट यांनी केला आहे. त्यावर चीनने स्कॉट यांच्याकडे पुराव्यांची मागणी केली आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी स्कॉट यांना आव्हान देत त्यांनी केलेल्या आरोपांचा पुरावा मागितला आहे. स्कॉट यांचा आरोप अमेरिकेने फेटाळला असून, याबाबत सुरुवातीपासून पारदर्शकता ठेवल्याचा दावा केला आहे.
रिक स्कॉट यांनी मात्र या आरोपाबद्दल पुरावे देण्यास नकार दिला आहे. गुप्तचर यंत्रणांनी हे पुरावे शोधले तर ते योग्य होईल, असे त्यांनी म्हटले आहे.









