प्रतिनिधी/ बेळगाव
बाजार गल्ली, वडगाव येथे जागृत मारुती मंदिरात शिवजयंतीनिमित्त हनुमान मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. पुजारी अजित कुलकर्णी यांनी मारुतीला पंचाभिषेक घातला. तर हभप वैजनाथ उचुकर यांनी रुईच्या 36 पानांवर ‘देश कोरोनामुक्त व्हावा’ असा मजकूर लिहिलेला हार अर्पण केला आहे. यावेळी कोरोनापासून लवकरात लवकर सुटका व्हावी आणि हा संसर्ग दूर व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली. लॉकडाऊनचे यावेळी पालन करण्यात आले.









