शुक्रवारी नव्याने 20 रुग्ण : मांगोरहिलमधील संख्या वाढतीच
प्रतिनिधी / पणजी
काल शुक्रवारी राज्यात नव्याने 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसांच्या मानाने काल कमी रुग्णांची नोंद झाली. आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा (उपचार घेणारे) 607 एवढा झाला आहे. यापुर्वीचे रुग्ण मिळून एकूण संख्या 725 असून आतार्यंत 118 जण बरे झाले आहेत. हॉटस्पॉट मांगोरहिलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 313 झाली आहे. शुक्रवारी 9 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
एकूण 3269 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 2015 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 1234 जणांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. मांगोरहिलशी संबंधित प्रकरणांचा आकडा 181 वर पोचला आहे तर विमान, रेल्वे व रस्तामार्गे गोव्यात आलेल्या रुग्णांची संख्या 71 एवढी आहे.
सडा वास्को येथे 30, बायणा येथे 30, न्यू वाडे 13, चिंबल 21, मोर्ले सत्तरी 19, केपे 4, कुडतरी 12 व राय येथे 7 रुग्ण सापडले आहेत. विविध ठिकाणी हॉटेल व रेसिडेन्सी मध्ये क्वारंटाईन केलेल्यांची संख्या 1018 एवढी आहे.
मागील चार दिवसांच्या मानाने काल शुक्रवारी सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे. गुरुवारी 49 पॉझिटिव्ह रुग्ण झापडले होते तर त्या अगोदर सलगपणे 27 व 37 अशी प्रतिदिन वाढ झाली होती.
गोव्यात 19 जून 2020 पर्यंत कोरोनाबाधित 725
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 118
उपचार घेणारे रुग्ण 607









