बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ८० दिवसानंतर राज्यात कोरोनाने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाईही केली जात आहे.
दरम्यान राज्यात कोविडची वाढती संख्या आणि कोरोनाची दुसरी लाटयेण्याची शक्यता असूनही, बहुतेक लोक सामाजिक अंतर आणि मास्क लावताना दिसत नाहीत. अनेक लोक नियमांबद्दल गंभीर नाहीत. गेल्या एका आठवड्यात राज्यात ३३ हजाराहून अधिक लोकांना दंड केला आहे. मास्क आणि सामाजिक अंतर ना पाळणाऱ्या ३३,२५१ नागरिकांना दंड ठोठावण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या बेंगळूर शहरात जास्त आहे. बेंगळूरमध्ये एकूण ११,६२४ घटना घडल्या आहेत.









