प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेकच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लसिकरणाला महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. महिला, तरूणी स्वयंसेवक म्हणून पुढे येत आहेत. गुरूवारी स्वयंसेवकांची नोंदणी वाढली, लसिकरण वाढले. रविवारपर्यत चाचणीचे टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि क्रोम कंपनीच्यावतीने सीपीआरमध्ये 10 दिवसांपासून तिसऱया टप्प्यातील चाचणी लसीकरण सुरू आहे. जिल्हÎातील 1 हजार स्वयंसेवकांना लस टोचण्याचे उद्दिष्ट आहे. तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस लसिकरणात अडथळे आले होते. पण आता नोंदणी अन् चाचणी लस घेणाऱयांची संख्या वाढली आहे. स्वयंसेवकांत महिला, तरूणींचा सहभाग वाढत आहे. दिवसभरात 160 हून अधिक जणांची नोंदणी झाल्याची माहिती चाचणी सेंटरवरून देण्यात आली.