बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याचबरोबर राज्यात कोरोना चाचणी अहवाल देखील वेळाने मिळत नसल्याचा तक्रारी नागरिकांमधून येत आहेत. त्यामुळे कोविड चाचणीचा अहवाल मिळविण्यासाठी होणार विलंब दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथनारायण यांनी कोरोना चाचणी अहवाल सात तासात मिळेल याची खात्री दिली.
उपमुख्यमंत्री आणि कोविड टास्क फोर्सचे प्रमुख सी.एन. अश्वथनारायण यांनी, “पूर्वी प्रयोगशाळेत नमुने पोहोचल्यानंतर चाचणी अहवाल मिळण्यासाठी २४ तास लागत असत. आता हे प्रमाण कमी करुन ७ तास केले गेले आहे. यामुळे लवकर चाचणी करून अहवाल देणे शक्य होईल. संसर्ग होण्याआधीच उपचार सुरू करणे आवश्यक आहे , असे ते म्हणाले.
तसेच उपमुख्यमंत्री अश्वथनारायण यांनी, जे लोक घरात अलिप्त आहेत त्यांची रक्त तपासणी केली जाईल. “रक्त चाचण्यांमुळे संक्रमित रूग्णांची स्थिती निश्चित करण्यात आणि स्थिती शोधण्यात मदत होईल,” असे ते म्हणाले.