विटेकरांशी ऑनलाईन संवाद साधत नगराध्यक्षांचे आवाहन
प्रतिनिधी/विटा
गेल्या काही दिवसापासून विटा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विटेकर नागरिकांनी घाबरुन न जाता या संकटाशी आपण सर्वानी स्वयंशिस्तीने लढा देऊया. शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांनी केले.
विट्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांच्या समस्या, सुचना यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी नगराध्यक्षा पाटील यांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले.
यावेळी बोलताना पाटील म्हणाल्या, कोरोना जागतिक महामारीने संपुर्ण जग हतबल झाले आहे. आपले शहर गेल्या चार माहिन्यापर्यंत कोरोनापासून बऱ्यापैकी मुक्त ठेऊ शकलो होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासुन शहरात कोरोनाचा प्रसार गतीने होत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या शहरातील अनेक परिवारांना सदस्य बाधित झाल्याने मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. ज्यांच्या घरी कोरोनाबाधीत सदस्य आहे, त्यांच्याशी बोलल्यावर कोरोनाचे गांभीर्य लक्षात येते. या गंभीर परिस्थितीत सर्वांची जबाबदारी वाढली आहे. शासन, प्रशासन, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी या पाच महिन्यामध्ये काय करावे, काय करु नये आणि जिवनशैली कशी असावी?, याबाबत भरपुर प्रबोधन केले आहे. आता यापुढे आपणाला इतर कोणी कसे वागायचे?, हे सांगण्याची वेळ येऊ नये. आपण सर्वांनी शहराच्या सुरक्षीततेसाठी प्रशासनाने दिलेले सर्व नियम पाळावेत, असे आवाहन नगराध्यक्षा पाटील यांनी केले.
नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे, यासोबत काही लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणे आपल्या हातात आहे. नगरपालिकेचे कर्मचारी सामाजिक कर्तव्यातून कोरोनामध्ये दुर्दैवाने मृत झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत. या सर्व पालिका कोरोना योध्यांच्या कामाचा आपल्याला अभिमान आहे, असे माजी नगराध्यक्ष ॲड वैभव पाटील यांनी सांगितले. विटेकर नागरिकांनी ऑनलाईन उपक्रमात सहभाग घेत प्रतिसाद दिला. आगामी काळात विटाशहराच्या नाविण्यपूर्ण जडणघडणीत अशा नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








