- लसीकरणासाठी आजपासून मॉकड्रिल
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसच्या लसीची चाचणी सोमवार म्हणजेच आजपासून पंजाबसह 4 राज्यांमध्ये सुरू होत आहे. ही ट्रायल मंगळवारपर्यंत सुरू राहील. या राज्यातील दोन दोन जिल्ह्यात चाचणीची ट्रायल केली जाणार आहे.
या दरम्यान, एका मॉकड्रिलचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कोणाला लस दिली जाणार नाही, मात्र, लसीकरणाच्या प्रक्रियेचे पूर्ण पालन केले जाईल.
- राज्यातील दोन दोन जिल्ह्यात सुरू होणार ट्रायल
आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, पंजाब, आंध्र प्रदेश, आसाम आणि गुजरात या चार राज्यांमध्ये लसीकरणाची ट्रायल घेतली जाणार आहे. यासाठी आवश्यक असणारी तयारी पूर्ण झालेली आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व माहिती घेणे आवश्यक आहे. या कालावधीत जिल्हा पथके लसीकरण बूथ वर कोल्ड चेनसह लोकांची नोंदणी तसेच लस कशाप्रकारे दिली जाईल, याशिवाय बूथ वर कशाप्रकारे तयारी करावी लागेल याचा सराव केला जाईल.









