वार्ताहर / कबनूर
कोरोची येथील एक महिला तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव आला असल्याने गावात नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे नांदणी येथील पॉझिटिव्ह इसमाच्या संपर्कातील एकाचा अहवाल निगेटिव्ह . तर बा धीत महिलेच्या घरातील तीन जण व डॉक्टरच्या संपर्कातील चार जण असे आठ जणांना हातकणंगले संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
कोरोची तालुका हातकणंगले येथील लोकमान्य नगरातील एक महिला अहमदनगर हुन आली होती. रविवारी रात्री 8 वाजता तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला ती अहमदनगर वरून कोरोची गावात न येता परस्पर चार दिवसापूर्वी हातकणंगले संस्थात्मक विलगीकरण केंद्रामध्ये दाखल झाली होती तिची प्रकृती खालावल्याने तिला आरोग्य केंद्रातील डॉक्टरनी स्वॅबचा रिपोर्ट येईपर्यंत कोरोची गावां त पाठविले नाही. संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. तिच्या संपर्कात कोणीहि आलेले नाही . परंतु तिचा नवरा, दीर व सासू यांना आरोग्य तपासणी साठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालय येथे पाठवून देण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने त्या भा गात औषध फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले . लक्ष्मी मंदिर पासून लक्ष्मी वसाहत व तानाजी चौक हा परिसर बॅरिकेट लावून सील करण्यात आले आहे .
तसेच नांदणी येथील आयुर्वेदिक औषध देणाऱ्या इसमाचा कोरोना पॉझिटिव ने मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कात कोरोची गावातील एकव्यक्ती आलेली होती. त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे.तसेच इचलकंजी येथील एका डॉक्टराकडे येथील विवेकानंद नगर मधील एक पेशंट तपासणीसाठी गेले होते. डॉक्टरांच्या संपर्कातील त्यात पेशंट सह चार जण हातकलंगले संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल झाले आहेत.
कोरोची गावामध्ये एक कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी सर्व नागरीकांनी सॅनिटायझर व मास्क वापर करावा सोशल डिस्टन्सचे पालन करून बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून हातकणंगले संस्थात्मक अलगीकरण केंद्रात दाखल व्हावे परस्पर कोणीही कोरोची गावांमध्ये येऊ नये परस्पर गावांमध्ये आलेले आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल असे आवाहन सरपंच रेखा पाटील, ग्राम विकास अधिकारी राजू जाधव पोलीस पाटील मारुती हेगडे यानी केले आहे. परिसरात औषध फवारणी करून घेताना माजी उपसरपंच अभिनंदन पाटील ग्रामपंचायत सदस्य सतीश सूर्यवंशी आरोग्य सेवक संदीप गणबावले दीपक तेली राजकुमार मिरजकर दीपक कांबळे मनोज कांबळे सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








