प्रतिनिधी/सांगली
गेल्या चार दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, धरण क्षेत्रासह काही भागात अधून मधून पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे धरण क्षेत्रातील पाणीपातळीत वाढच होत आहे. कोयना धरण क्षेत्रात आज 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजता धरणाची पाणी पातळी 2152 फूट 0 इंच झाली असून धरणामध्ये 90.46 TMC पाणीसाठा झाला आहे.
धरणाची वक्रद्वारे 24 जुलै 2021 पासून 5 फुट 6 इंच वर स्थिर आहेत. सध्या सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 33045 क्युसेक्स विसर्ग चालू आहे.
धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता धरणाची वक्रद्वारे एकूण 9 फुट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 49300 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणेत येणार असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
Previous Articleसरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग ; रश्मी शुक्लांचा दावा
Next Article अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन एम्स रुग्णालयात दाखल








