नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नवारस्ता / प्रतिनिधी :
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात रविवारी सकाळी 103.19 टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज (रविवारी) दुपारी 2 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 10 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाचा जोर वाढतच असल्याने आज 12 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता धरणाची पाणी पातळी 2161 फूट 11 इंच झाली असून धरणामध्ये 103.19 TMC पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक अपेक्षित आहे.त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी 2 वाजता धरणाची सहा वक्रद्वारे 1 फुट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 10000 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. दरम्यान, धरणामधील आवक वाढल्यास सदर विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.









