23 हजार 380 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
नवारस्ता / प्रतिनिधी :
कोयना धरणात 103.19 टीएमसी पाणीसाठा झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी दुपारी 2वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 10 हजार 264 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र धरणात पाण्याची आवक वाढतच गेल्याने सायंकाळी पुन्हा सहा वक्र दरवाजे अडीच फुटांनी उचलून धरणातून एकूण 25 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला.
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच असल्याने रविवारी दुपारी 2 वाजता धरणाची सहा वक्रद्वारे 1 फुट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 10 हजार 264 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणेत आला. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिकच वाढू लागल्याने धरणात येणारी पाण्याची आवक मध्ये ही वाढ होऊ लागल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पुन्हा धरणाचे सह वक्र दरवाजे अडीच फूट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 23 हजार 380 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.