ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस, आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करत आहेत. त्यातच आता रमजानच्या अनुषंगाने कोणतेही सण जाहीरपणे किंवा सार्वजनिक रित्या साजरे न करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत.
ते म्हणाले, रमजान सार्वजनिकरित्या साजरे करू नका. अनेक मौलवींनी तसा फतवा काढला आहे. शहरात संचारबंदी देखील लागू आहे. मात्र, कोणी सामाजिक तेढ निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
पुढे ते म्हणाले, क्षमतेपेक्षा जास्त कैदी असलेले राज्यातील सहा जेल लॉक डाऊन करण्यात आले आहेत. कारागृह पोलीस जेल मधेच राहणार असून नव्याने कोणीही आत जाणार नाही किंवा बाहेर देखील येणार नाही.
सध्या औरंगाबादमध्ये 29 कोरोनाबाधित आहेत. शहरात आत्तापर्यंत 1300 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर एक हजार जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. तसचं 1300 बेड ची व्यायस्था देखील करण्यात आली आहे.









