प्रतिनिधी/वारणानगर
कोडोली ( ता. पन्हाळा ) येथील ग्रामपंचायत मार्फत पुरवठा करणेत येणारा पाणीपुरवठा सोमवार ते गुरुवार असे चार दिवसासाठी बंद राहणार असल्याची माहिती सरपंच शंकर पाटील यांनी एका पत्रकाद्वारे जाहिर केली आहे.
कोडोली गावाला पाणीपुरवठा करणारी योजना काखे- मांगले मार्गावरील वारणा नदीवर काखे येथे आहे. नदीजवळ असलेल्या जॅकवेलमध्ये पुराचे पाणी जात असलेने मोठ्या प्रमाणात गाळ साचला जातो. गाळ साचला असल्यामुळे पाणी साठवणेची क्षमता कमी होते याचा परीणाम उपसा मोटारीवर होत आहे. त्यामुळे साचलेला गाळ काढणेचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे असे सरपंच शंकर पाटील यानी सांगीतले.
हा गाळ काढणेचे काम मंगळवार पासून सुरू करणेत येणार आहे परंतु पुर्व तयारी करणे करीता सोमवार पासून मोटारी बंद राहणार आहेत. नागरीकांनी पाणी जपून वापरावे तसेच नियमीत पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतरही नागरीकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे असे प्रशासनामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








