मुंबई
गृहकर्जांवरील व्याजदरात बँका व आर्थिक सेवा देणाऱया कंपन्या नेहमी बदल करत असतात व याचा फटका ग्राहकांना बसत असल्याचे दिसून येते. सध्या खासगी क्षेत्रात कार्यरत असणारी कोटक महिंद्रा बँक यांनी गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक आता गृहकर्जावर 6.55 टक्के वर्षाला व्याजदर आकारणार आहे. यापूर्वी हा व्याजदर 6.50 टक्के होता.
बँकेने या नवीन व्याजदराची घोषणा सोमवारी केली होती. यामुळे या नवीन निर्णयाची अंमलबजावणी ही 9 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून 10 डिसेंबरपर्यंत हा व्याजदर लागू असणार असल्याची माहिती आहे. याचदरम्यान कोटक महिंद्रा बँकेने बाजारातील आमचा हा सर्वात कमी व्याजदर राहणार असल्याचा दावा केला आहे.
अन्य बँकांची स्थिती पाहिल्यास यामध्ये युनियन बँकेचा सध्याचा गृहकर्जाचा व्याजदर हा 6.45 टक्के आहे. हा व्याजदर गृहकर्जातील सर्वात कमी असल्याची माहिती आहे. या अगोदर सप्टेंबरमध्ये कोटक महिंद्रा बँकेने सणासुदीच्या काळात व्याजदरात कपात केली होती.